tembe-swami-round
swami-loknath-terth-round
श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

निवासी महायोग साधना शिबीर

श्री वासुदेव निवास मध्ये महिन्याच्या प्रत्येक चौथ्या शनिवारी आणि रविवारी निवासी महायोग साधना शिबिराचे आयोजन केले जाते. निवासी साधना शिबिराला येऊ इच्छिणाऱ्या साधकांसाठी निवास आणि भोजनाची नि:शुल्क सुविधा श्री वासुदेव निवास मध्ये उपलब्ध आहे.  निवासी साधना शिबिराला येऊ इच्छिणाऱ्या साधकांनी शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत श्री वासुदेव निवास मध्ये पोचावे. निवासी शिबिरासाठी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी ऑनलाइन फॉर्म खाली देण्यात आला आहे.

सर्व महायोग साधना शिबिरे ही केवळ कुंडलिनी शक्तिपात महायोग दीक्षा घेतलेल्या साधकांसाठीच असतात याची कृपया नोंद घ्यावी. कुंडलिनी शक्तिपात महायोग दीक्षा नसेल तर साधना शिबिरासाठी येऊ नये ही विनंती. 

निवासी महायोग शिबिराची रूपरेषा

शनिवार
संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत श्री वासुदेव निवास मध्ये आगमन.
साधना: संध्याकाळी सव्वा सहा ते सव्वा सात
आरती: ७.३० ते ८.००
भजन: ८.०० ते ८.३०
उपाहार: ८.३० ते ९.३०
महायोग विषयक शंका समाधान: ९.३० ते १०.३०
विश्रांती: रात्री १०.३० ते ५.००

रविवार:
सामुदायिक साधना: पहाटे ५.०० ते ६.०० 
वैयक्तिक उपासना: सकाळी ६.०० ते आठ
सामुदायिक साधना: ८.०० ते ९.०० 
मार्गदर्शन: सकाळी ९.०० ते ९.४५ 
उपाहार: १०.०० ते १०.३०
सामुदायिक विष्णूसहस्त्रनाम पाठ: १०.३० ते ११.३० 
महाप्रसाद: दुपारी १२.०० ते १.३०, महाप्रसादानंतर शिबिराची सांगता

निवासी महायोग साधना शिबिरास उपस्थित राहू इच्छिणाऱ्या साधकांनी खालील फॉर्म भरून सबमिट करावा.

साप्ताहिक सामुहिक साधना

साप्ताहिक सामुहिक साधना दर रविवारी सकाळी ८.०० ते ९.०० या वेळेत होईल. ९.०० ते ९.४५ महायोग संबंधी मार्गदर्शन आणि त्यानंतर अल्पोपहार होईल.
साप्ताहिक सामुहिक साधनेस उपस्थित राहण्याकरिता वरील फॉर्म भरून पाठविण्याची आवश्यकता नाही.

साप्ताहिक सामुहिक साधना ही  केवळ कुंडलिनी शक्तिपात महायोग दीक्षा घेतलेल्या साधकांसाठीच आहे याची कृपया नोंद घ्यावी. कुंडलिनी शक्तिपात महायोग दीक्षा नसेल तर साप्ताहिक सामुहिक साधना येऊ नये ही विनंती.